Wednesday, August 12, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District बिभवी जिल्हा परिषद शाळेला अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची अचानक भेट

बिभवी जिल्हा परिषद शाळेला अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांची अचानक भेट

347
Adv

जावळी तालुक्यातील बिभवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेला सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी नुकतीच अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची प्रगती, गुणवत्ता तसेच उपलब्ध सोयी-सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
भेटीदरम्यान वर्गामध्ये जाऊन डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनी कुमारी पूर्वी देशमुख हिचे त्यांनी विशेष कौतुक केले. पूर्वीच्या यशाबद्दल डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
“ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत हुशार आणि मेहनती आहेत. पूर्वीसारख्या विद्यार्थिनीचे यश हे शिक्षक, पालक आणि संपूर्ण शाळेच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे,” असे गौरवोद्गार डॉ. प्रिया शिंदे यांनी यावेळी काढले.
यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान’ या विषयावरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक व विषमुक्त आहाराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
शाळेतील स्वच्छता, सोयी-सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी मुख्याध्यापक अशोक लकडे तसेच सर्व शिक्षकवृंदाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक अशोक लकडे, शिक्षक दिपाली दुंदळे, योगेश दिघे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Adv