केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना

142
Adv

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विटरद्वारे दिली असून कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल आला असून याद्वारे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय.

याबाबतची माहिती देताना अमित शाह यांनी, “कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता मी रुग्णालयात भरती होणार आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घ्यावी.”

Adv