Friday, November 27, 2026
spot_img
Home Uncategorized देवेंद्र फडणवीसांचा बेकायदा फ्लेक्सबाजीला अप्रत्यक्ष इशारा; नेते-कार्यकर्त्यांनो, जनतेत दिसा, होर्डिंगवर नाही!

देवेंद्र फडणवीसांचा बेकायदा फ्लेक्सबाजीला अप्रत्यक्ष इशारा; नेते-कार्यकर्त्यांनो, जनतेत दिसा, होर्डिंगवर नाही!

58
Adv

बेकायदा होर्डिंगची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ही समस्या गंभीर बनली आहे. वाढदिवस, पदनियुक्ती, राजकीय स्वागत, सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण केले जाते. अनेकदा वाहतुकीलाही त्याचा अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारांवर एकदाच कारवाई करून थांबण्याऐवजी सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे गरजेचे आहे.

साताऱ्यातही पुण्याच्या धर्तीवर अनधिकृत फ्लेक्सवर हातोडा पडणार का?
देवेंद्र फडणवीसांनी पुणे प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक केल्यानंतर आता सातारा नगरपालिकेच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. वाढदिवस, सत्कार आणि राजकीय स्वागताच्या नावाखाली शहरात लागणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सवर पालिका प्रशासन कारवाई करणार का, हा खरा सवाल आहे.

विशेष म्हणजे पुणे प्रशासनाने बेकायदा होर्डिंगविरोधात स्वीकारलेली अभिनव आणि पुणेरी धाटणीची संकल्पना विशेष कौतुकास्पद ठरली आहे. उद्या स्वतःच्या नावाचा बेकायदा होर्डिंग लागला, तरी प्रशासनाने पुरस्कारांच्या यादीत आपलेही नाव जाहीर करावे, अशी मिश्किल पण तितकीच स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. यातून कोणताही नेता किंवा कार्यकर्ता नियमांच्या वर नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आता नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या काळात राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्वागताचे, अभिनंदनाचे आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करून बेकायदा होर्डिंग रोखण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Adv