Thursday, November 12, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला १८ नोव्हेंबरला!

जिल्हा बँकेच्या सत्तेचा फैसला १८ नोव्हेंबरला!

64
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६-२०३१ या कालावधीसाठी निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी अखेर सभेची अधिकृत नोटीस काढण्यात आली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे

बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील संचालक मंडळ सभागृहात बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड केली जाणार असल्याने जिल्हा बँकेतील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि उपाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सहकार क्षेत्रासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुतीतील नेत्यांच्या राजकीय समीकरणांची खरी कसोटी आता या निवडीत लागणार असून, बुधवारच्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Adv