Saturday, April 25, 2026
spot_img
Home Maharashtra *शेवटचा डाव फक्त दिमाखदार हवा होता, जिंकण्यापेक्षा कायम लक्ष्यात राहील.. असाचं !

*शेवटचा डाव फक्त दिमाखदार हवा होता, जिंकण्यापेक्षा कायम लक्ष्यात राहील.. असाचं !

141
Adv

मानपणाचे – हारजीततीचे कितीतरी पेच-प्रसंग पाहिलेत त्याने आयुष्यात. असंख्य अडचणी, यातना, समस्या, कुटील कारस्थानं, पदोपदी बदनामी, द्वेष, दुःख, पावलागणिक वाटेत उभे केलेले स्वकीयांचेच संकटांचे डोंगर हे सारं त्याला आता नित्याचचं झालेलं. खोट्या जबानी आणि झुट्या साक्षीने तर वेळोवेळी त्याला हरवण्याचा घाट घातला होता. ‘तो’ माञ शांत, अविचलपणे आयुष्याच्या खडतर वाटेवर माराक्रमन करत होता.

जिकरीचे अनेक अडथळे त्याच्या वाटेचे वाटसरूच झालेले. जन्मापासून आजतागायत सहज-सोप्पं त्याच्या वाट्याला कधीही काहीही नाही आलं. नियतीच्या आघातांनी त्याच्या जीवनात क्षणाक्षणाला अग्निपरीक्षेची शर्थ केलेली. कुंडलीतच हक्कदार असलेल्या गादीवर फक्त तो वारसदार नाही म्हणून त्याला दूर लोटलं गेलं. संघर्षाची पताका खांद्यावर घेऊन ‘तो’ माञ चालत होता.

जिवाभावाची माणसं, सखेसोबती साथीला आणि जनसामान्यांचा आशीर्वाद फक्त गाठीला होता. या बळावरच तो लढवय्या लढा देत खडा होता. हा लढा कोणाविरुद्ध नव्हताच.. सत्य – असत्याची, पात्र – अपात्रतेची, न्याय – अन्यायाची, नीती – अनीतीची ही लढाई होती. नियतीशी न्यायासाठी झगडत होता तो एकाकी. कळीकाळाच्या कल्लोळातही तो एकटाच दिमाखाने मिरवत होता.

त्याचा एकाच गोष्टीवर ठाम विश्वास होता. काळ ! काळ कुणाचा सोयरा नव्हे बस्स ! कुणासाठी कधी थांबला नाही काळ. ऊनसावलीचा, अनुभवाचा सारा खेळ हा काळाचा. आज इकडे तर उद्या तिकडे. पण सत्यासाठी कराल काळाशी आपण असं झुंजु की काळही गडबडून जाईल, असं आत्मविश्वासपूर्ण तेज त्याच्या नजरेत आणि लढण्याचं सामर्थ्य पाहणाऱ्यांना दिसत होतं. यावेळी नियतीनेच त्याच्या बाजूने जनसामान्यांचा दैवीकौल उभा केला होता.

शेवटी मैदानही त्याचंच होतं आणि त्या मैदानातील मल्लही तोच एकटा गडी होता. आता काळही त्याच्याच होता, वेळीही, नियतीही आणि विधाताही त्यांच्याच बाजूने आज उभा होता. डाव रंगात आलेला. निमिषात सगळं पालटणार. स्वकर्तुत्वान असलेलं त्याचं निश्चल मन सगळ्या पलिकडे जाऊन उभं राहिलं. नियतीने स्वतः भोवती मांडलेल्या साऱ्या खेळाचा सारीपाट त्रयस्थपणे पाहू लागलं. ‘तो’ जिंकला होता पण त्याला शेवटचा डाव फक्त दिमाखदार हवा होता, जिंकण्यापेक्षा कायम लक्ष्यात राहील.. असाचं !
#DMVictory

Adv