भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि. 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर केला आहे.
नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक दि. 6 नोव्हेंबर 2019, हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.19 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि. 23 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दि. 26 डिसेंबर व दि. 30 डिसेंबर 2019 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल.
या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी ही सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसिल कार्यालय येथे सुरु आहे. पदवीधर मतदारांसाठी नमुना 18 व शिक्षक मतदारांसाठी नमुना 19 चा फॉर्म वरील कार्यालयांमध्ये उपलब्ध असून त्याठिकाणी नोंदणी करता येईल. पदवीधारक मतदार नोंदणीसाठी रंगीत फोटो, रहिवासी पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स व पदवी प्रमाणपत्र याच्या सत्यप्रती तसेच शिक्षक मतदार नोंदणीसाठी ज्या संस्थेमध्ये शिक्षक पदावर तीन वर्ष अध्यायनाचे काम केले आहे त्यासंस्थेकडील अभिलेखानुसार प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मतदार नोंदणीची फॉर्म मंडळ स्तरावर उपलब्ध करु देण्यात येतील. तरी जास्तीत जास्त शिक्षक व पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक व पदवीधर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
Home Satara District शिक्षक व पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे आवाहन...