मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहराच्या विकासाला आणखी एक महत्त्वाची चालना मिळाली आहे. सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक बाग विकसित करण्यासाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खासदार छ उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे साताऱ्याच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र शासनाकडे सातारा शहरातील विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यामध्ये ऐतिहासिक बागेच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीला आता यश मिळाले असून, बागेच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून ऐतिहासिक बागेचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, सातारा शहराच्या ऐतिहासिक व पर्यटन वैभवात भर पडणार आहे. नागरिकांसह पर्यटकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सातारा शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना या निधी मंजुरीच्या माध्यमातून यश आले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शना खाली स्वीकृत नगरसेवक पंकज चव्हाण यांनी सातारा शहराच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सातारा नगरपरिषद हद्दीतील विकासकामांसाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.






