Wednesday, September 30, 2026
spot_img
Home Satara District Jawali अमोल शिंदे यांच्यावरील कथित भ्याड हल्ल्याचा शशिकांत शिंदे समर्थकांकडून जाहीर निषेध

अमोल शिंदे यांच्यावरील कथित भ्याड हल्ल्याचा शशिकांत शिंदे समर्थकांकडून जाहीर निषेध

355
Adv

जावळी तालुक्यातील हुमगाव येथे राजकीय वादातून घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे समर्थक अमोल शिंदे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आखाडा सोसायटीच्या ठरावावरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा दावा या निषेध पोस्टमधून करण्यात आला आहे. “आखाड्यात गुंडगिरी… आखाडा कोणी केला?” असा सवाल उपस्थित करत, मतभेद असले तरी त्याचे रूपांतर हिंसाचारात होणे योग्य नसल्याचे समर्थकांनी म्हटले आहे.
अमोल शिंदे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध करताना संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कायदा हातात घेणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जावळीतील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे, हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि संबंधितांवर पोलिसांकडून कोणती कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv