Monday, July 27, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District रेशमाताई भोसले यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

रेशमाताई भोसले यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

25
Adv

शिवसेना पक्षाने सातारा जिल्ह्यातील महिला संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा पक्षाच्या सक्रिय नेत्या रेशमाताई भोसले यांची शिवसेना महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

शिवसेनेने सातारा जिल्ह्यात महिला संघटना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या अगोदर महिला जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून रेश्मा जगताप यांची वर्षभरापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे रेशमाताई भोसले यांची आज शिवसेना महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पदांवर ‘रेश्मा’ नावाच्या कार्यकर्त्यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

रेशमाताई भोसले या फलटण तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून त्यांनी काम करताना विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीनंतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतील मान्यवरांकडून रेशमाताई भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्यास आणि पक्षाचा जनसंपर्क वाढविण्यास त्या प्राधान्य देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रेशमाताई भोसले यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रेश्मा जगताप या पक्ष संघटन, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि महिला संपर्क वाढविण्यासाठी काम करणार आहेत. तर फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेशमाताई भोसले यांच्यावर जिल्हाभर महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Adv