Friday, July 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हा बँकेवर भाजपचा डोळा?

जिल्हा बँकेवर भाजपचा डोळा?

12
Adv

सातारा जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात भाजपकडे एक खासदार, चार आमदार आणि एक विधानपरिषद आमदार असे प्रभावी राजकीय बळ आहे. जिल्हा परिषदेतही भाजपने आपले अस्तित्व अधिक मजबूत केले असून, आता सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपची नजर असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवायची की महायुतीतील मित्रपक्षांसोबत युती करायची, याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, भाजपच्या वाढत्या राजकीय ताकदीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता भाजप जिल्हा बँकेवर कमळ फुलविण्यासाठी स्वतंत्र रणनिती आखणार का, की पारंपरिक सहकाराच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv