Thursday, July 23, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सातारा दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सातारा दौऱ्यावर

106
Adv

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सातारा दौऱ्यावर; महेश शिंदे यांच्या मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन
सातारा : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण हे शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते कोरेगाव तालुक्यातील माढोज (रामेश्वरवाडी) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार असून, त्यानंतर सातारा जिल्हा भाजपची संघटनात्मक बैठकही घेणार आहेत.
सकाळी सातारा येथे आगमन झाल्यानंतर रवींद्र चव्हाण हे सातारा जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. त्यानंतर ते कोरेगाव तालुक्यातील लक्ष्मणराव इनामदार उर्फ ‘वकील साहेब’ सिंचन योजना व ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करतील. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भूमिपूजनानंतर चव्हाण कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा भाजपची संघटनात्मक बैठक घेणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनबांधणी आणि पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्या या दौऱ्याकडे सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसह महायुतीतील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही विशेष लक्ष लागले आहे.

चर्चेचा मुद्दा:
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात तरी जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले यांचे दर्शन होणार का? हा प्रश्न सध्या साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. उपलब्ध दौरा कार्यक्रमात जिल्हा संघटनात्मक बैठकीत त्यांचा संदर्भ असला तरी, प्रत्यक्ष दौऱ्यातील उपस्थिती आणि भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv