Wednesday, July 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District राष्ट्रवादीवर ठराविक नेत्यांचा प्रभाव? साताऱ्यातील फ्लेक्सवरून राजकीय चर्चा

राष्ट्रवादीवर ठराविक नेत्यांचा प्रभाव? साताऱ्यातील फ्लेक्सवरून राजकीय चर्चा

110
Adv

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगू लागली आहे. साताऱ्यात नुकत्याच लावण्यात आलेल्या पक्षाच्या फ्लेक्सवरून अनेक राजकीय प्रश्न उपस्थित होत आहेत. फ्लेक्सवर विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची छायाचित्रे नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पक्षाच्या जिल्हास्तरावरील कार्यक्रमांमध्ये काही मोजक्याच नेत्यांनाच महत्त्व दिले जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबतही राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये असा सूर उमटत आहे की, पक्षाची धुरा जर काही ठराविक नेत्यांपुरतीच मर्यादित राहिली, तर राष्ट्रवादीचा विस्तार संपूर्ण सातारा जिल्ह्यात कसा होणार? पक्ष सर्व तालुक्यांत बळकट होणार की एका तालुक्यापुरताच मर्यादित राहणार, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, फ्लेक्सवरील प्रतिनिधित्वाबाबत संबंधित नेत्यांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा केवळ फ्लेक्सचा विषय आहे की पक्षातील अंतर्गत राजकारणाचे संकेत, याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

पक्षातील काही ठराविक नेत्यांचाच प्रभाव वाढत असून इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे यांच्या भूमिकेबाबतही कार्यकर्त्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Adv