Sunday, July 5, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार

91
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. बँकिंग व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ सरकाळे यांचा गौरव करण्यात आला

या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सरकाळे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बँक भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Adv