दि.१/७/२०२६ : वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, जावली व कोरेगांव या तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर अर्थिक संकट असताना व कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या ऊस पिकावर संकट आलेले असता त्यांना वाऱ्यावर न सोडता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांनी कारखान्याची सुत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर मागील चार वर्षामध्ये शेतकरी, वाहन मालक. व्यापारी यांची सर्व देय्यक दिली. शासनाचीही देणी वेळेवर दिल्यामुळे आज महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त व्हॅट भरणा व कायदा व शिस्तीचे अनुपालन केल्यामुळे कारखान्यास महाराष्ट्र राज्य वस्त् व सेवा कर विभाग सातारामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही मिळालेला असून या पुरस्कारामुळे किसनवीर कारखान्यावरील पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीचा सन्मान तसेच सर्वच स्तरातून वाढणारी विश्वासर्हता वाढत असल्याची भावना कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली.
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, नामदार मकरंदआबा पाटील यांनी कारखान्याची सुत्रे हातात घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करता त्यांच्या हितालाच प्रथम प्राधान्य दिले. कारखाना व्यवस्थापनाने संस्थेच्या हिताकरिता काही कठोर निर्णय घेऊन सुधारणाही केल्यामुळेच आज सर्व स्तरावर किसन वीर कारखान्याप्रती ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच ठिकाणी विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. कोणत्याही बँकेच्या अर्थसहाय्याशिवाय शेतकऱ्यांची मागील चार वर्षामध्ये ऊस बीलाची सर्व रक्कम दिलेली आहे. तसेच आर्थिक शिस्त पाळत, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून नियमितपण जीएसटी, इन्कम टॅक्स, व्हॅट, कामगारांचे प्रॉव्हीडंड फंड आणि इतर कर भरण्यावर भर देऊन शासकीय पातळीवरही नावलौकिक मिळविला असून सलग दुसऱ्या वर्षीही हा पुरस्कार मिळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नातील किसन वीर कारखाना लवकर सत्यात येणार असल्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल असल्याचे मत यावेळी व्हाईर चेअरमन प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केले.
राज्य कर सहआयक्त श्रीमती प्रज्ञा पांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात कारखान्याच व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक संदिप चव्हाण, चीफ अकौंटंट आर. जी. उन्हाळे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
किसन वीर कारखान्यास व्हॅट भरणा व कायदा व शिस्तीचे अनुपालनानिमित्त पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळ यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.






