Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District सातारा जिल्ह्यातील महायुतीचे पारडे अधिक मजबूत

सातारा जिल्ह्यातील महायुतीचे पारडे अधिक मजबूत

12
Adv

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. या भेटीत धैर्यशील कदम यांनी दोन्ही नेत्यांचे पाठिंबा, मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आभार मानले.

महायुतीच्या विजयासाठी सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करत असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीची ताकद आणखी वाढविण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

धैर्यशील कदम यांनी, “महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची साथ हीच माझी खरी ताकद आहे,” अशी भावना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

याभेटीमुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणाला नवे बळ मिळाल्याचे मानले जात असून, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे धैर्य खुलले

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा एकत्रित पाठिंबा मिळाल्याने महायुतीचे पारडे अधिक मजबूत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि महायुतीतील एकजुटीच्या बळावर धैर्यशील कदम यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

धैर्यशील कदम विजयी झाल्यास सातारा जिल्ह्याला त्यांच्या रूपाने आणखी एक आमदार मिळणार असून, जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मतभेद व राजकीय वाद तूर्तास बाजूला ठेवत सर्व पक्षांनी विधान परिषद निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.

Adv