शुक्रवार पेठ परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामामुळे पालिकेची गटर व्यवस्था तुंबल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बांधकामातील माती, राडारोडा आणि इतर साहित्य गटरमध्ये गेल्याने परिसरातील सांडपाणी व्यवस्थेवर परिणाम होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शुक्रवार पेठ परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामामुळे पालिकेची गटर व्यवस्था तुंबल्याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. बांधकामातील माती, राडारोडा व इतर साहित्य गटरमध्ये गेल्याने पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिल्डरकडून परिसरातील नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरली जात असून त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार नेत्यांच्या प्रभागातच घडत असल्याने पालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गटर तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, सदर बांधकामाच्या ठिकाणी सात ते आठ नगरसेवक नियमितपणे ये-जा करत असून कामाची पाहणी करत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे एवढ्या लोकप्रतिनिधींची नजर या कामावर असताना गटर तुंबण्याचा प्रकार कसा घडला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांची मागणी आहे की, गटर तुंबण्यास जबाबदार असलेल्या संबंधित बिल्डरची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त गटर तातडीने स्वच्छ करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पालिकेने कडक नियमांची अंमलबजावणी करावी.
“नेत्यांच्या प्रभागातच बिल्डरांचा उतमात;पालिकेने कठोर कारवाई करावी,अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.कामाची पाहणी करणारे नगरसेवक अनेक, पण गटार तुंबल्याची जबाबदारी घेणार कोण?”






