Sunday, September 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हाप्रमुखांचा बुकेही न स्वीकारता एकनाथ शिंदे थेट दरेगावी रवाना

जिल्हाप्रमुखांचा बुकेही न स्वीकारता एकनाथ शिंदे थेट दरेगावी रवाना

263
Adv

कोल्हापूर दौरा आटोपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आले असता, शिवसैनिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी केली होती. जिल्हाप्रमुख रणजीत भोसले हे शाल व पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी उपस्थित होते. मात्र, शिंदे यांनी वाहनातून खाली न उतरता थेट दरेगावकडे प्रस्थान केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी शाल आणि पुष्पगुच्छ स्वीकारला गेला नसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले विशेषतः जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्या स्वागताकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा घटनास्थळी रंगली.

या घटनेमागे वेळेची कमतरता, पूर्वनियोजित कार्यक्रम की अन्य काही कारण होते, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. मात्र, या प्रसंगाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेनेच्या स्थानिक संघटनांमध्येही याविषयी विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

Adv