Thursday, August 6, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City एका खांबावर तीन दिवे… तरी शुक्रवार पेठेचा मुख्य रस्ता अंधारात; म्हेत्रे साहेब,...

एका खांबावर तीन दिवे… तरी शुक्रवार पेठेचा मुख्य रस्ता अंधारात; म्हेत्रे साहेब, हे कसले नियोजन?

115
Adv

शुक्रवार पेठेतील प्रमुख रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एका खांबावर तब्बल तीन दिवे बसविण्यात आले, पण त्यातील एक दिवा बंद आहे, तर समोरील दिव्याचा प्रकाश रस्त्यावर न पडता थेट इमारतीवर जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
मग प्रश्न असा की, दिवे नेमके नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बसवले आहेत की इमारती उजळण्यासाठी?
रस्त्यावर अंधार असल्याने पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. तरीही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
म्हेत्रे साहेब, फक्त उद्घाटने आणि फोटोसेशन पुरेसे नाही. रस्त्यावर उतरून नागरिकांच्या अडचणी सोडवा. प्रमुख रस्त्यावर दोन दिवसांपासून अंधार असणे ही गंभीर बाब आहे.

म्हेत्रे साहेब, हा विकासाचा नमुना म्हणायचा की नियोजनातील मोठी चूक? नागरिकांना रस्त्यावर प्रकाश हवा आहे; खांबावर दिव्यांची संख्या मोजायची नाही.
रस्त्यावर अंधारामुळे अपघात, चोरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

Adv