माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सहकुटुंब खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली
भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मोहिते पाटील कुटुंब यांचे ऋणानुबंध अख्या महाराष्ट्राला माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही लोकसभेचे सदस्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सातारा दौऱ्यावर आले असता त्यांनी सहकुटुंब जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली
काही दिवसांपूर्वी छत्रपती उदयनराजेची तब्येत बरी नसल्याचे समजले होते त्यामुळे त्यांची आवर्जून भेट घेतली असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले






