Saturday, April 11, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City भाजप ची सत्ता असलेल्या सातारा नगरपरिषदे मध्ये महिला नगरसेविकेवर अन्याय – सुशांत...

भाजप ची सत्ता असलेल्या सातारा नगरपरिषदे मध्ये महिला नगरसेविकेवर अन्याय – सुशांत मोरे

148
Adv

सातारा – सातारा नगरपालिकेची सत्ता दोन छत्रपतींच्या अधीपात्याखाली असताना 12 नंबर प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेविका सौ. भारती किशोर शिंदे यांना 8 विषय समित्यापैकी कोठेही सदस्य म्हणून घेतले नाही. हि लाजिरवाणी बाब आहे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे सामाजिक माहिती अधिकार पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली आहे.
दिनांक 11/2/2026 रोजी श्री. छ. शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभा मा. पिठासीन अधिकारी तथा मुख्यधिकारी सातारा नगरपरिषद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी उपस्थित असलेल्या 53 नगरसेवक मध्ये शिंदे भारती किशोर या उपस्थित होत्या. विषय समित्यामध्ये स्थायी समिती आणि दुर्बल घटक समिती वगळून इतर समित्यामध्ये 15 सद्यस्य आहेत. काही नगरसेवक यांना 2 समितीचे सद्यस्य करण्यात आले. परंतु भारती शिंदे यांना स्थान देण्यात आले नाही. महिला बाल कल्याण समितीमध्ये सुद्धा स्थान देण्यात आले नाही. हि चूक प्रशासनाची आहे का दोन्ही आघाडीतील तथाकथित म्होरक्याची आहे हे सातारकरांना कळलेच पाहिजे. ज्याची चूक असेल त्यास क्षमा नसावी कारण मातृ शक्तीवर अन्याय आहे. आणि ज्यांना 2 समिती मध्ये स्थान दिले आहे त्यापैकी एका समितीचा कोणाचा तरी राजीनामा घेऊन भारती ताई शिंदे यांना स्थान दिले पाहिजे.
नगरपरिषद मध्ये कुरघोडी करण्याचे शडयंत्र थांबणायचे नाव घेत नाही. तथाकथित म्होरक्यामुले महिला नगरसेविका वर अन्याय झाला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना आरक्षण देणेकामी अधिवेशन बोलावून कायदा दुरुस्त करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच भारतीय जनता पार्टी ची सत्ता असलेल्या सातारा नगरपारिषदेमध्ये भारती शिंदे या भारतीय जनता पार्टी च्या महिला नगरसेविका वर अन्याय होत आहे. शुक्रवार पेठेत राजकीय वर्चस्व असलेल्या शिंदेना नेमके कुणाला संपवायचे आहे याचा साताऱ्यातील
जानकारांनी शोध घ्यावा..

Adv