काही दिवसांपूर्वी पाटण मतदारसंघात टांगा पलटी घोडे फरार असे फ्लेक्स बोर्ड झळकले होते आता मात्र भाजपने अध्यक्ष पदावर दावा केल्याने राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्याबरोबर गेली तर या दोन्ही पक्षाचाच टांगा पलटी घोडेफार होणार हे मात्र नक्कीच
काल भाजपच्या बैठकीत जिल्ह्यातील दोन्ही मंत्री महोदयांनी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होणार असे सुतोवाच केले त्यामुळे भाजपचा अध्यक्ष होतोय की शिवसेना राष्ट्रवादीचा हे बघने आता उत्सुकतेचे असेल तत्पूर्वी भाजपच्या नेत्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचंड टीका केली ही टीका विसरून शिवसेना राष्ट्रवादीचे नेते भारतीय जनता पार्टी बरोबर गेले तर नक्कीच त्यांच्या अध्यक्षपदाचा टांगा पलटी घोडे फरार होणार
शिवसेना राष्ट्रवादीने संयमाने निवडणूक जिंकली तर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या तालुक्यात जाऊन संबंधित नेत्यांना डीवचले नेते कार्यकर्ते यांना पंधरा दिवस पळताभूई थोडी झाली होती असे चित्र काही तालुक्यात दिसून आले शिवसेना राष्ट्रवादी भाजप बरोबर गेल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होणार हे त्रिवार सत्य असून मंत्री देसाई व मकरंद पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे
भाजपचे दोन दिग्गज मंत्री असताना एक हाती सत्तामिळवण्यास अपयश का आले याचा अभ्यास भारतीय जनता पार्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करणार का भारतीय जनता पार्टीच्या काही झालेल्या उमेदवाराचा पराभव नक्की कोणामुळे झाला याचे विश्लेषण समाज व माध्यमं समोर येणार का हे सुद्धा बघणे उत्सुकतेचे असेल सतेत कोणी बसावे हा ज्या त्या पक्षाचा व नेत्यांचा अधिकार असून काही ठराविक झालेल्या भाजप उमेदवारांचा पराभवाचे विश्लेष होणे गरजेचे असल्याचेही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले
टांगा पलटी घोडे फरार व्हायचे नसले तर शिवसेना व राष्ट्रवादीने स्पष्ट भूमिका घेऊन विजयी उमेदवार सांगणे गरजेचे असून कार्यकर्ते व जिल्ह्या समोर जर या दोन्ही पक्षाची प्रतिक्रिया स्पष्ट झाली नाही तर कार्यकर्ते ही बुचकाळ्यात पडणार व भाजपची वाट धरणार हे मात्र नक्की






