Thursday, April 16, 2026
spot_img
Home Latest News Crime बांधकाम व्यवसायिकास खंडणी,जबरी चोरी मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बांधकाम व्यवसायिकास खंडणी,जबरी चोरी मारहाण प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

78
Adv

तुला साताऱ्यात बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला १ लाख रुपये लगेच आणि पाच लाख रुपये मागणी करून न दिल्याने बांधकाम व्यावसायिकास शिवीगाळ,दमदाटी आणि हाताने मारहाण करत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे.या प्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलिसांत कलम खंडणी, जबरी चोरीसह दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,

सातारा शहरात सिव्हिल कॉलनी,संभाजीनगर येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक समर्थ अनिल लेंभे (वय ३०) यांना तुला साताऱ्यात बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला १ लाख रुपये आणि लगेच ५ लाख रुपये मागणी करून ते न दिल्याने शिवीगाळ,दमदाटी,हाताने मारहाण करून ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लेंभे यांची काळ्या रंगाची टाटा हॅरियर चार चाकी गाडी घेऊन निघून गेले. तसेच दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी पारंगे चौकात सकाळी ११ वाजता फिर्यादीला त्यांच्या गाडीसह शिवराज पेट्रोल पंपाच्या बाजूला बाजार समितीचे रस्त्यावर मोकळ्या जागेत घेऊन गेले यावेळी आरोपींनी आम्हाला तिघांना प्रत्येक पंधरा लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत हाताने मारहाण करून तुझी गाडी देखील माघारी देणार नाही आणि प्रत्येकी 15 लाख रुपये आम्हाला 25 डिसेंबर पर्यंत द्यायचे अन्यथा तुला साताऱ्यात राहणे मुश्किल करीन नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली याप्रकरणी निखिल प्रभाळे, रणजित कांबळे,हणमंत पवाडे आणि एक अनोळखी व्यक्तींविरोधात लेंभे यांनी दि १३ रोजी सातारा शहर पोलिसांत फिर्याद दिली.त्यांच्यावर कलम ३०८(१), ३०८(४), ११५(२), ३५१(२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करत आहेत.

Adv