जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा निधी पूरग्रस्तांना

108
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला शाही सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आता पूरग्रस्तांकडे वळवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे याची घोषणा शुक्रवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही

महाराष्ट्रावर संकट आले की सातारा जिल्हाकायमच उभा राहिलेला आहे जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आता पूरग्रस्तांकडे वळवण्याचा निर्णय झाला असून या निर्णया मुळे जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासनाधिकारी राजेंद्र सरकाळे सर्व स्तरातून स्वागत होत आहे

जिल्हा बँक कायमच मदत करण्यासाठी अग्रेसर असते त्याप्रमाणे आज त्यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पूरग्रस्तांसाठी मदत केली असली तरी नक्की किती रुपयांची मदत जाहीर होईल हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे

Adv