पीओपीचे विघ्न दूर…

211
Adv

पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत असून यापुढे आम्ही न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच काम करणार असल्याचे मूर्तिकार पोपट कुंभार यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवल्याने मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.
Ko

पीओपीच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्री करण्यास बंदी नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन होणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार?, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 30 जून ही पुढील सुनवाईची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय आहे.

Adv