Saturday, May 9, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City मोती चौक बनतोय फ्लेक्स चौक. पालिकेने लक्ष देण्याची गरज

मोती चौक बनतोय फ्लेक्स चौक. पालिकेने लक्ष देण्याची गरज

61
Adv

मोठमोठ्या होर्डिंगच्या दुर्घटनेने राज्यात अनेकांचे जीव गेलेले आहेत साताऱ्यात मात्र उलटे होत असून प्रत्येक चौकात बिल्डिंगवर मोठमोठे होर्डिंग उभे राहत असून एक दिवशी या होर्डिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य सातारकरांचा जीव जाणार हे मात्र नक्की?असून याकडे पालिकेच्या पदाधिकारी संबंधित नगरसेवकांचे दुर्लक्ष की मुद्दाम केलेला कानाडोळा असेच म्हणावे लागेल

मोती चौकाला एक आपली आगळीवेगळी ओळख असून ती ओळख आता फ्लेक्सचा चौक म्हणून ओळखायला सुरुवात झाली असून चारही बाजूने या चौकातील बिल्डिंगवर फ्लेक्सचे होल्डिंग उभे राहिलेले दिसतात त्याला कारणही तसेच कि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांनी वेळीतच असले चुकीचे प्रकार रोखले तर सर्वसामान्य सातारकारांचा जीव वाचेल

सातारा पालिकेने साताऱ्यातील सर्व फ्लेक्स स्ट्रक्चर चा ऑडिट रिपोर्ट तयार करणे गरजेचे असून मोती चौकात उभे राहत असलेले फ्लेक्स चे होर्डिंग हे अधीकृत की अनधिकृत हे कळायला मार्ग नसले तरी या फ्लेक्स कडे बघितल्यावर एक प्रकारे धडकिच भरत आहे

मुख्याधिकारी अभिजीत बापट कर्तव्यदक्ष.. मात्र शहर विकास विभागातील अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते या विभागातील शरद बर्डे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणले मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो त्यामुळे अधिकाऱ्यांणा जर याची कल्पना असेल तर हे अधिकारी कधी कर्तव्यनिष्ठ होणार हा खरा प्रश्न आहे

Adv