Tuesday, May 26, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी श्रीमंत रामराजेंचे बॅनर झळकले

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी श्रीमंत रामराजेंचे बॅनर झळकले

318
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन पुणे येथील बालेवाडी येथे साजरा होत असून याच ठिकाणी माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फ्लेक्स झळकल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

लोकसभा विधानसभा या निवडणुकीदरम्यान कुठेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोणत्याही पक्षाच्या जाहीर स्टेजवर आले नव्हते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26 वा वर्धापन दिन पुणे येथील बालेवाडी येथे साजरा होत असून याच ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे फ्लेक्स झळकल्याने चर्चेला ला उधाण आलं आहे

अजितदादांच्या कार्यक्रमादरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागताचे फ्लेक्स झळकल्याने महाराष्ट्रात एकच चर्चा रंगू लागली आहे जिल्ह्यात कुठेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजून पक्ष म्हणून सक्रिय झालेले नाहीत मात्र पक्षाच्या वर्धापन दिली फ्लेक्स बघायची पाहायला मिळाल्याने पुन्हा त्यांचा राष्ट्रवादीत श्री गणेशा झाला असल्याचे बोलले जात आहे

Adv