Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City रवी भाऊ, राष्ट्रवादीचाही विचार करा

रवी भाऊ, राष्ट्रवादीचाही विचार करा

378
Adv

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा कधीही जाही होऊ शकतात. त्याआधी पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी शिवसेना पक्षाचे ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र यादरम्यान रवींद्र धंगेकरांना दादांच्या राष्ट्रवादीकडूनही ऑफर आली आहे.

रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी निवडणुकीत हार जीत चालतच असते. नेतृत्व, कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच. काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत. तुझ्यासारखे काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता, लोकप्रनिधिनी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल. बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ नाते कायम आहेच, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

Adv