Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

241
Adv

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे,’ अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी शिष्टमंडळासह येऊन चर्चा केल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.

Adv