Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पुण्यात बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद

पुण्यात बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद

258
Adv

संवाद साधण्यासाठी सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती राज्याचे पणन मंत्री आणि कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे हे परिषदेचे आयोजक आहेत. परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिषदेचे उद्घाटन करतील. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी या परिषदेस उपस्थित असतील.

राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांच्या ६२३ उप बाजारांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या ४० वर्षापासून सुरू आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात कालानुरूप बदल घडविणे, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणे, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

Adv