Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District Panchgani पाचगणीतील हॉटेल हिराबागमध्ये पोलीसांची कारवाई

पाचगणीतील हॉटेल हिराबागमध्ये पोलीसांची कारवाई

487
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

पाचगणी, 7 जानेवारी 2025: पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटन
स्थळावर ‘हॉटेल हिराबाग’मध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या 12 महिलांना उत्तान कपड्यात विभत्स हावभाव करणाऱ्या बारबाला नृत्यात सामील करून अश्लिल नृत्याचे आयोजन केले गेले होते. या नृत्याच्या प्रसंगी महिलांनी गि-हाईकांसोबत अंगविक्षेप करत नृत्य केले, जे पाहून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल हिराबागमध्ये छापा टाकला. घटनास्थळी 20 गि-हाईकांसोबत 12 बारबाला उत्तान कपड्यांमध्ये विभत्स हावभाव करत उभ्या होत्या. गि-हाईक आनंदाने या नृत्यात सहभागी झाले होते.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या 20 लोकांमध्ये हॉटेलचे मालक आणि इतर सहभागी यांचा समावेश आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे. कुल 25,45,500 रुपये किंमतीच्या साहित्याचा जप्ती आदेश दिला आहे.

या प्रकरणावर महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष कायद्यातील कलम 296, 223, महिला प्रतिष्ठा संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3 व 8, तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 75 (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Adv