Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Maharashtra महाराष्ट्रात नमामी कृष्णा योजना राबवावी..छ उदयनराजे

महाराष्ट्रात नमामी कृष्णा योजना राबवावी..छ उदयनराजे

585
Adv

जनतेच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही आणि ठाम भुमिका घेणा-या खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी,महाबळेश्वर मुक्कामी आलेले,राज्याचे राज्यपाल महामहिम श्री.रमेश बैस यांची महाबळेश्वर येथील राजभवन येथे सुमारे अर्धातास भेट घेवून राज्याच्या विकासाच्या विविध मुदयांवर चर्चा केली.

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज महामहिम राज्यपाल मा.रमेश बैस,यांना स्वयंस्पष्ट निवेदन देताना,राज्याच्या विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली.यामध्ये क्षेत्रमहाबळेश्वर मध्ये उगम पावून,सातारा सांगली जिल्यातुन पुढे कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे बंगालच्यासागराला मिळणा-या कृष्णा नदीचे सुशोभिकरण आण शुध्दीकरण करण्यासाठी नमामी गंगा योजनेच्या धर्तीवर नमामी कृष्णा योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यात राबविणे,बौध्द सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे,या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधुन,छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृध्दींगत करण्याकरीता तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याच्या,राजगड,रायगड आणि सातारा यातीन राजधान्यांचा सुचीबध्द आणि समयबध्द विकास करणे, तसेच पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे,जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या समृध्द इतिहास परंपरेचेअवलोकनासाठी जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील आणि पर्यटनाला देखिल अधिक चालना मिळेल.

महाबळेश्वर जवळील प्रतापगड सह राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यासाठी योजना आखणे,महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरीता स्थापित करण्यात आलेल्या उच्यस्तरीय संनियंत्रण
समितीवर, संसद-विधीमंडळ प्रतिनिधींसह,स्थानिकलोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारव्दारे प्रसिध्द करणेकरीता राज्याने पावले टाकणे या प्रमुख विषयांसह अन्य काही विषयांवरराज्यपाल महामहीम रमेश बैस यांचेशी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चर्चा केली.राज्यपाल महोदय यांनी अत्यंत आस्थवायीकपणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सविस्तर मांडलेल्या मुद्दे समजून घेताना,याविषयी राज्यशासनाचे प्रशासन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करेल असे नमुद केले.या चर्चेच्या वेळी खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खाजगी सचिव जितेंद्र खानविलकर,गणेश भोसले, अॅडव्होकेट विनित पाटील,प्रमुख उपस्थित होते.

Adv