सातारा शहरात सलग दुसर्या दिवशीही अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी महामार्गावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना दि. 23 मे रोजी राधिक चौकात घडली आहे. याप्रकरणी श्वेता समीर खुटाळे (वय 40, रा. सदाशिव पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 72 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भर चौकात मंगळसूत्र चोरी झाल्याने पुन्हा एकदा चोरांचा सुळसुळाट झाला की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे