सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत गृहनिर्माण मतदारसंघातून काका धुमाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा पेढा भरवून सत्कार केला. या सत्कारातून उदयनराजे आणि काका धुमाळ यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित झाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गृहनिर्माण मतदारसंघातून काका धुमाळ यांनी बिनविरोध निवड मिळवत संचालकपदावर आपली मोहोर उमटवली. त्यांच्या या निवडीनंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी काका धुमाळ यांनी, “श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालीच जिल्हा बँकेचा कारभार करणार,” अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा बँकेतील आगामी कामकाजात छ उदयनराजेंच्या मार्गदर्शनाला महत्त्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा बँकेच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना काका धुमाळ यांची बिनविरोध निवड आणि त्यानंतर झालेला हा सत्कार लक्षवेधी ठरला आहे.






