पक्ष वाढीसाठी खंडाळ्याचा घाट ओलडून न आलेल्यांना दिल्लीचे लागले डोहाळे

353
Adv

लोकसभेसाठी इच्छुक असणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे मात्र काही सन्माननीय खंडाळाचा घाट ओलांडून पक्ष वाढीसाठी कधी आले नाहीत अशा काहीना दिल्लीचे डोहाळे लागले असल्याचे दिसून येते मीच सर्वोच्च पदावर मीच लोकसभेचे उमेदवार अशी भावना घेऊन जर पक्षात माणसं काम करायला लागले तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघायचे अशी चर्चा सर्व पक्षात रंगू लागली आहे

लोकसभेची निवडणूक तोंडावर असून प्रत्येक पक्षाला तिकीट कसे मिळवता येईल यासाठी जोर लावताना दिसून येतोय पक्ष वाढीसाठी कोणी कोणी प्रयत्न केले याची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नक्कीच आहे जिल्ह्यात आपला पक्ष वाढवा अशी कोणाच्याही कृतीतून दिसून आली नाही फक्त मीच दिल्लीवर स्वार होणार सर्वांचे डोहाळे लागले असल्याचे आता कृतीतून दिसू लागले आहे

येत्या पंधरा दिवसात राजकीय चित्र स्पष्ट होईल की नक्की कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला जातोय तोपर्यंत आपणच उमेदवार असल्याचे डोहाळे सर्वांना लागणार यात शंका नाही मात्र या डोहाळ्याच्या पायी ऐतिहासिक खंडाळ्याच्या घाटात उलट्या होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार हे मात्र नक्की जिल्ह्यातील काही नेत्यांची दिल्लीवर स्वार होण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत त्यासाठी स्वतःची ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर वर्चस्व असावे लागते मोजकेच दोन लोकप्रतिनिधी सोडले तर अशा कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती वर्चस्व नसल्याचे दिसून येते

Adv