Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City दादांची राष्ट्रवादी वाढवणारा साताऱ्यातील बिल्डर कोण

दादांची राष्ट्रवादी वाढवणारा साताऱ्यातील बिल्डर कोण

1227
Adv

सातारा जिल्ह्यात एका बिल्डरच्या माध्यमातून दादांची राष्ट्रवादी वाढवण्याचे प्रयत्न सध्या चालू असल्याचे दिसून येते आपल्या श्री नावाचा उपयोग राष्ट्रवादी पक्षात श्री गणेशा करून लक्ष्मी दर्शन घेण्याचे प्रात्यक्षिक ही हा बिल्डर देत असल्याचे समजते? याच बिल्डरने काही साताऱ्यातील अनेक बिल्डरांना घेऊन भल्यापाटे सहा वाजता मुंबई पुणे येथे दादांची भेट घेऊन बरीच कामे वाजवल्याची चर्चा यांच्याकडून ऐकव्यास मिळते

दादांची राष्ट्रवादी सातारा शहरात वाढावीरुजावी यासाठी आता चक्क एक नामांकित बांधकाम व्यवसायिक काही दिवसांपासून जिल्ह्यात फिरत आहे आपण दादांच्या पक्षात प्रवेश करावा प्रशासनाच्या माध्यमातून तुमची कामे करून देतो असे सांगून तो बिल्डर आपली 17 मजली पोळी भाजून घेत असल्याचे दिसून येते सातारा शहरात जसा म्हणावा तसा राष्ट्रवादी पक्ष वाढला नाही नेत्यांपेक्षा बांधकाम व्यवसायिक आणि हाती घेतल्याचे सध्या चित्र आहे त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकाला कोण कोण बळी पडते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल

एखादा पक्ष वाढवणे हे नेत्याचे काम असते मात्र साताऱ्यात या उलट चित्र असून चक्क सातारा शहरातील ओढे नाल्यांवर अतिक्रमण करून आपली व्यवसायाच्या माध्यमातून उंच उंच बिल्डिंग बांधणाऱ्या या बिल्डरला साताऱ्यात पक्षाचे नेतेपद द्यावे अशी खाजगी चर्चा रंगू लागली आहे ज्या बिल्डरने शहरातील मोक्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्त्रोत वळवून आपली पोटाची खळगी भरली असा बिल्डर दादांची राष्ट्रवादी वाढवत असेल तर आश्चर्य वाटायला नको

Adv