Friday, June 5, 2026
spot_img
Home Satara District श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतूकीत बदल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतूकीत बदल

212
Adv

दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 14.00 वा पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.

पालखी सेाहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये जा करतील याची इतर वाहन धारकांनी नोंद घ्यावी.

Adv