Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत”; ‘त्या’ बॅनरवरून नितेश राणेंचा अजित...

आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत”; ‘त्या’ बॅनरवरून नितेश राणेंचा अजित पवारांना टोला

165
Adv

भाजपचे नेते नारायण राणे नेहमीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. अशात खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. त्यांच्या याच ट्विटवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचे विधान केले आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असे अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

Adv