नक्षत्र महोत्सवाचे शानदार उद्घाटन

384
Adv

महिला बचत गटांच्या चळवळीला राज्य शासनाचा नेहमीच मोठा पाठिंबा राहिला आहे. येथील नक्षत्र महोत्सवांमध्ये सहभागी झालेल्या 207 महिला बचत गटांना नक्षत्र परिवाराने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ ही मार्केटिंगची मोठी संधी आहे त्यामुळे भविष्यात अशाच वाटचालीद्वारे नक्षत्र हा महिला बचत गटांसाठी मोठा ब्रँड ठरावा आणि या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ करून देणे शक्य आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले

येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर खासदार उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला नक्षत्र खरेदी महोत्सव यंदा 16 व्या वर्षात पदार्पण करत आहे नक्षत्र महोत्सव 2022 चे शानदार उद्घाटन झाल्या प्रसंगी ज्ञानेश्वर खिलारी यांनी उपस्थितांशी आपल्या मनोगतातून दिलखुलास संवाद साधला यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, कोविड डिफेंडर ग्रुपचे सन्माननीय सदस्य व उदयनराजे समर्थक विनीत पाटील तसेच नक्षत्र परिवाराच्या माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके माजी माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडिक, स्नेहल राजेश शिर्के, माजी नगरसेविका माया पवार, धनश्री महाडिक, कल्पना चतुर, आशा जाधव, अरुणा नाझरे, सुनिता फरांदे,सीमा किर्दत, अलका शेटे इत्यादी सन्माननीय संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्ञानेश्वर खिलारी बोलताना पुढे म्हणाले, नक्षत्र या महिला बचत गटासाठी वाहिलेल्या चळवळीने दीड दशकाचा टप्पा गाठला आहे .महिला बचत गटांसाठी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि त्याही बाहेर एका विशिष्ट व्यासपीठावरून पुढे जाण्याची संधी उपलब्ध होत असून महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या उद्योगांना याच व्यासपीठावरून विपणनाची वेगळी संधी निर्माण करावी . जास्तीत जास्त महिला बचत गटांच्या चळवळी अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे याव्यात जेणेकरून नक्षत्र हा ब्रँड होण्याच्या मार्गावर असून त्याकरिता जास्तीत जास्त कुटीर उद्योग, गृह उपयोगी उद्योग तसेच खाद्यपदार्थांविषयीची नवीन नवीन संशोधन हे सातत्याने पुढे आले पाहिजे . नक्षत्र हा त्या पद्धतीने ब्रँड तयार झाल्यास विविध शासकीय योजना या माध्यमातून उपलब्ध होऊन सातारा जिल्ह्याच्या महिला बचत गट चळवळीला मोठी चालना मिळणार आहे . खासदार छ उदयनराजे भोसले आणि नक्षत्र परिवाराचे अध्यक्ष आदरणीय राणीसाहेब दमयंती राजे भोसले यांनी फार सुचक दृष्टीने महिला बचत गटांना उत्तेजन देणारा नक्षत्र परिवार आणि त्याची चळवळ मोठ्या दमदारपणे सुरू ठेवली आहे याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो असे खिलारी म्हणाले

कार्यक्रमाची सुरुवात नक्षत्र परिवाराच्या दर्शनी कमानीवर फीत कापून प्रदर्शनाचे ज्ञानेश्वरी खिलारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर खिलारी यांनी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या 207 स्टॉल्स वरील प्रत्येक स्टॉलला आवर्जून भेट देत तेथील उत्पादनांची चौकशी केली आणि सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेतल्या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनं करण्यात आले .नक्षत्र परिवाराच्यावतीने स्मिता घोडके यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . ज्ञानेश्वर खिलारी यांचे स्वागत नक्षत्र परिवाराच्या सदस्या माजी नगरसेविका माया पवार यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माजी नगराध्यक्ष सुजाता राज्य महाडिक यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .हा महोत्सव नऊ ते 13 डिसेंबर यादरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी दहा असा सुरू राहणार आहे या प्रदर्शनाला साधारण दोन लाख सातारकर भेट देतील असा ठाम विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे सातारकरांनी या प्रदर्शन पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नक्षत्र परिवाराच्या सौ स्मिता घोडके व सुजाता राजे महाडिक व परिवाराच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे

Adv