Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी श्री.शेख व काळे यांची निवड

जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी श्री.शेख व काळे यांची निवड

209
Adv

सातारा शहरासह जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक लि. साताराच्या सेवक संचालकपदी श्री. हमीद अ. शेख व श्री.युवराज ता. काळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. जनता सहकारी बँक कर्मचारी संघाने याबाबत दिलेल्या प्रस्तावास बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळ सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हा. चेअरमन बाळासाहेब गोसावी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर, केतन जगदाळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

श्री. विनोद कुलकर्णी यांनी श्री.शेख व काळे यांनी बँकेच्या सेवेतील केलेल्या उत्तम कामकाजाबाबत गौरवोद्गार काढून बँकेतील त्यांच्या चांगल्या कामकाजाची दखल कर्मचारी संघ व संचालक मंडळाने घेतली असल्याचे विशद केले. आज संचालक मंडळावर निवड झाल्यामुळे ते सर्वांचे अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रशांत शास्त्री, प्रशासन अधिकारी अनिल जठार, जनता सहकारी बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष व माजी सेवक संचालक श्री.उमेश साठे, श्री. सुरेंद्र वारद, अधिकारी श्री.विनोद शिंदे, श्री. संजय काटकर उपस्थित होते. नवनिर्वाचित सेवक संचालकांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला हे यश प्राप्त झाल्याचे सांगून सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

Adv