Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७२ वी वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७२ वी वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

240
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७२ वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि .२०/०८/२०२२ रोजी खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अहवाल सालात समाजाशी, सहकार चळवळीशी, बँकेशी बांधिलकी असणा-या, निधन पावलेल्या सभासद मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूर जवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बँक खातेदार, बँकेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने श्रध्दांजली वाहिली ..
बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील यांनी बँकेच्या अहवाल सालातील कामाचा, प्रगतीचा, कार्याचा आलेख सभेसमोर विषद केला .यामध्ये शेतकरी सभासद, सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून विकासाभिमुख करीत असलेले काम, कृषि व ग्रामीण विकास योजना इ .चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली. नुकतेच बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल’ केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री. अमित शहा यांचे शुभ हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करणेत आला. बँकेच्या या यशस्वी वाटचालीत कै. लक्ष्मणराव पाटील, कै. सदाशिवराव पोळ, कै. दादाराजे खर्डेकर, कै. विलासराव पाटील (वाठारकर ), मा. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा असून या दशकातील जवळपास ७ वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळणारे मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, मा. आ. श्री. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, मा. आ. श्री. मकरंद पाटील यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले . विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .बँकेची वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली, बँकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल सभासदांनी बँकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

जिल्हयातील ९५४ विकास सेवा संस्थांपैकी ९१३ विकास संस्था नफ्यात असून या विकास सेवा संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन व्हावे, त्यांना योग्य न्याय मिळावा व इतर संस्थांनी या संस्थांचा आदर्श घ्यावा याकरीता संस्थांची कार्यक्षमता अजमावून उत्कृष्ठ कामकाज करणा-या विकास संस्थांना विशेष पुरस्कार देणेत आले .यामध्ये जिल्हास्तरावर रेठरे बुा विकास सेवा संस्था लि ., रेठरे बुा यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रुपये ५००००/- आणि तालुकास्तरावर सातारा-श्री .भैरवदेव विकास सेवा संस्था लि .,करंजे, पाटण- मोरगिरी ग्रुप विकास सेवा संस्था लि, वाई-अनवडी विकास सेवा संस्था लि .,जावली- सरताळे विकास सेवा संस्था लि ., महाबळेश्वर- पाचगणी विकास सेवा संस्था लि ., कोरेगांव-नहरवाडी विकास सेवा संस्था लि ., खंडाळा- भादवडे विकास सेवा संस्था लि ., फलटण- राजाळे विकास सेवा संस्था लि .,खटाव- म्हासुर्णे विकास सेवा संस्था लि ., माण- महिमानगड विकास सेवा संस्था लि .यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रुपये २५०००/- देवून गौरविणेत आले .

Adv