Tuesday, June 9, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छ उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

छ उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

386
Adv

सातारा शहरात भव्य दहिहंडी स्पर्धेचे आयोजन तालिम संघाच्या मैदानावर गोविंदा मंडळांचे दहिहंडी थरांचे कसब पहाण्याची सातारकरांना संधी. उद्या रविवार दिनांक २१/८/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वांजता, दहिहंडी फोडण्याचा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामध्ये भरघोस आणि मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सातारकरांनी दहिहंडीचा थरार पहाण्यासाठी तालिम संघाच्या मैदानावर उपस्थित रहावे.

दोन- तीन वर्षाच्या कालखंडानंतर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात यंदाचा दहिहंडी उत्सव होत आहे. गोविंदा पथकातील गोविंदांचे कसब, धारिष्ट आणि दहिहंडीचा थरांचा थरार आणि कमाल पहाण्याची सुसंधी सातारकरांना यानिमित्ताने, तालिम संघाच्या मैदानावर पहायला मिळणार आहे.

या दहिहंडीच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांत प्रथम क्रमांकाचे रुपये १ लाख ७७ हजार ७७७/- रुपयांचे बक्षिस तसेच जे गोविंदा पथक चार थरांपेक्षा जास्त थर लावण्यात यशस्वी होतील म्हणजेच किमान ५ थर लावतील परंतु दहिहंडी फोडन्यात यशस्वी होणार नाहीत अश्या गोविंदा मंडळांना देखिल प्रत्येकी रुपये 5 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस प्रदान करण्यात येणार आहे.

या भव्य दहिहंडीच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाची सर्व तयारी अंतिम टप्यात आली आहे. तालिमसंघाच्या विस्तीर्ण मैदानावर अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, उच्य दर्जाची साऊंड सिस्टीम आणि मोठे स्टेज उभारण्यात येत आहे. तसेच गोविंदा मंडळांना कोणतेही शुल्क न देता या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. ठाणे, मुंबई येथील गोविंदा पथकांसह जिल्ह्यातील प्रसिध्द गोविंदा मंडळांना स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून आणि सातारकरांना रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दहिहंडी निमित्त गोविंदा पथकांचा साहसी थरार पहाण्याची संधी मिळावी म्हणून रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी या भव्य दहिहंडीचे स्पर्धात्मक नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सातारकरांनी तालीम संघाचे मैदानावर उपस्थित रहावे.

Adv