Saturday, July 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City स्वातंत्र्यदिना निमित्त एहसास मतिमंद शाळेस दिले कपाट भेट

स्वातंत्र्यदिना निमित्त एहसास मतिमंद शाळेस दिले कपाट भेट

334
Adv

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साताऱ्यातील विनायक गोसावी यांच्या जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून एहसास मतिमंद शाळेला कपाट भेट देण्यात आले

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव नुकताच संपन्न झाला याचे औचित्य साधून विनायक गोसावी यांच्या जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून एहसास मतिमंद शाळेला एक कपाट भेट दिले ग्रुपच्या नावातच जनसेवा असा उल्लेख असल्याने जनसेवेचे भान या युवा वर्गाला दिसते अशी भावना येथील शिक्षकांनी व्यक्त केली शाळेला येथून पुढेही काही मदत लागल्यास आम्ही ती 100% करणार असल्याची ग्वाही जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष विनायक गोसावी यांनी यावेळी दिली

कोरोनाच्या काळातही जनसेवा ग्रुप ने विविध समाजातील गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला होता यापुढेही गोरगरीब लोकांसाठी काम करणार असल्याच्या ठाम विश्वास जनसेवा ग्रुपचे विनायक गोसावी यांनी यावेळी सांगितले

Adv