Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूनगर येथे कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हेमलता ताई भोसले यांचा...

शाहूनगर येथे कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हेमलता ताई भोसले यांचा संयुक्त उपक्रम सातारा

231
Adv

प्रसिद्ध उद्योजक व खासदार छ उदयनराजे भोसले समर्थक सागर भोसले यांच्या जय सोशल फाउंडेशनच्या हेमलता ताई भोसले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूनगर येथे ग्रामसेवक भवनमध्ये आयोजित लसीकरण आणि जॉब कार्ड नोंदणी शिबिरास शाहूनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निरामय आरोग्य आणि असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांची नोंदणी या दोन हेतूसाठी आयोजित शिबीर अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरले या दोन्ही शिबिराचा हेतू साध्य केल्या बद्दल जय सोशल फाउंडेशनच्या वतीने शाहूनगरवासीय यांचे आभार मानण्यात आले

गेल्या दोन वर्षापासून जय सोशल फाउंडेशन शाहूनगरचा सर्वांगीण विकासासाठी सातत्याने धडपडत आहे या धडपडीचे आणखी एक मूर्त स्वरूप गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले कामाच्या गडबडीत असो किंवा काही कारणास्तव कोविडचा दुसरा डोस घेऊ न शकलेल्या नागरिकांची रुग्णालयात जाऊनच घेण्याची उद्दिष्ट साध्य होत नव्हते ही गरज लक्षात घेऊन जय सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ग्रामसेवक भवन येथे कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले या लसीकरण शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद दिला या शिबिरांमध्ये सुमारे चारशे नागरिकांनी लसीकरण करून घेतले तसेच शाहूनगर परिसरामध्ये असंघटित क्षेत्रातील महिला कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र काही कारणा भावी यांना श्रमिक कार्ड काढता येत नाही त्यामुळे वेगवेगळ्या शासकीय धान्य आर्थिक मदतीची लाभ त्यांना मिळू शकत नाही ही अडचण लक्षात घेऊन हेमलता ताई भोसले महिला मंडळाच्या वतीने या नोंदणी शिबिराचे सुद्धा ग्रामसेवक भवनमध्ये नियोजन करण्यात आले होते

या शिबिरांमध्ये सुमारे 413 महिलांची नोंदणी करण्यात आली या शिबिरा विषयी बोलताना जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले म्हणाले शाहूनगर मधील नागरिकांच्या सुविधा ओळखून त्याकरिता सातत्याने जय सोशल फाउंडेशन काम करत आहे समाज उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे हे काम यापुढे सातत्याने सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू करणार आहे हेमलता ताई भोसले यांनीही महिला संघटन आणि रोजगार निर्मिती तसेच महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले

Adv