मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी

290
Adv

शिवसेनेत बहुचर्चित बंड केलेले नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे मोठे मोठे बॅनर सातारा ते कराड या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावर झळकल्याने जिल्ह्यातील खळबळ उडाली आहे एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा बॅनरबाजी ची सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा गुरुवारी घडून आली

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दरे गावचे असून ते शिवसेनेतून बंडखोरी करून 42 आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल झाले आहेत सातारा मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेने मोट बांधण्याचा प्रयत्न चालविला होता शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक निलेश मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते शिंदे यांच्या बंडखोरी पासून साताऱ्यातून बाहेरगावी आहेत शिवसेनेचे दुसरे आमदार शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे हेसुद्धा या बंडात सामील झाले आहेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे बॅनर सातारा ते कराड दरम्यान धडकल्याने या बॅनरबाजीची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली

सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दोनच दिवसांपूर्वी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहोत अशी स्पष्ट भूमिका घेतली होती स्वतः संपर्कमंत्री नितीन बानगुडे हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत शिवसैनिक हे वेट अँड वॉच या भूमिकेत असताना जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे बॅनरबाजी झाल्याने पुन्हा एकदा राजकीय दुही वाढली आहे त्यामुळे नक्की शिवसैनिक कोणता झेंडा हाती घेणार असा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे

Adv