Thursday, June 18, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार ...

पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार बैठक

448
Adv

:पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेदीचे वृत्त विविध प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पवार व जाधव कुटुंबीयांमध्ये बैठक घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा उत्साहात सुरु आहे.

जिल्हा तालीम संघाची स्थापना करण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भोसले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण, (कै.) पैलवान श्रीरंग जाधव, साहेबराव पवार यांच्यासह तत्कालीन पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून लवकरच बैठक घेणार असल्याचेही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

Adv