सातारा: दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांमधून लोकप्रिय असलेल्या प्रहसन म्हणजेच स्किट या कलाप्रकाराचा आस्वाद सातारकरांना महाराष्ट्रदिनी मनमुराद घेता येणार आहे. श्री. छ. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. एक मे रोजी श्री. छ. प्रतापसिंह महाराज सेवाधाम’ आणि ‘सातारा रंगकर्मी’ यांच्या संयुक्त सहभागातून ‘हास्पतारा’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या संघास मानाचा ‘चंद्रलेखाराजे चषक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी दिली.
ही स्पर्धा एक मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून शाहू कला मंदिरात रंगणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर राज्यभरातून येणाऱ्या केवळ 30 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट स्कि चषका’ सह 15 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या स्किटला अनुक्रमे 10 हजार आणि 7 हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच चषक देण्यात येणार आहे. सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. त्याचबरोबर व्यक्तिगत पारितोषिकांमध्ये ‘हास्यतारा’ (सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता), ‘हास्पतारका’ (सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री), सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या बक्षिसांचा समावेश आहे.
स्किट 7 ते 10 मिनिटाचे असावे, स्पर्धक संघांना रंगभूषा, वेशभूषा आणि संगीत वापरण्यास परवानगी असेल, मात्र सामान्य (जनरल) प्रकाशयोजनेतच स्किट सादर करावे लागेल, असे संयोजकांकडून सांगण्यात आले. तसेच स्क्रेिट विनोदी असावे; परंतु आक्षेपार्ह, दर्जाहीन भाषेचा वापर करू नये, असे आवाहनहीं संयोजकांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक संघास पाचशे रुपये प्रवेश शुल्क आणि पाचशे रुपये अनामत रक्कम असे एक हजार रुपये भरावे लागणार असून, सादरीकरणानंतर अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे.






