Saturday, June 6, 2026
spot_img
Home Maharashtra गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व देवेंद्र फडणीस यांची खा उदयनराजे...

गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व देवेंद्र फडणीस यांची खा उदयनराजे यांनी घेतली भेट

589
Adv

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात यश मिळाले. गोवा राज्यात भाजपने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. उद्या भाजपचे गटनेते प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या पूर्वसंध्येला आज प्रमोद सावंत यांचे गोव्यात अभिनंदन केले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. तसेच प्रमोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यानी केलेल्या कामगिरीवर गोव्यातल्या जनतेने विश्वास दाखवल्याबद्दल प्रमोद सावंत आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे कौतुक केले.

गोवा विधानसभा सदस्यांनी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. प्रमोद सावंत यांनी गेल्या पाच वर्षात गोव्याचा विकास आणि पर्यटन यांवर भऱ दिला आहे. यापुढील काळात प्रमोद सावंत हे गोव्याचा विकास जोमाने करून गोव्यातील जनतेचा नक्की विश्वास संपादन करतील असा विश्वास आहे.

गोव्यातील शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय निरीक्षक व केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या या शानदार सोहळ्यास आम्ही मनापासून शुभेच्छा देतो.

Adv