Wednesday, June 10, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पोलिसांना निघेना जुना मोटर स्टँड वरील गाड्यांचे अतिक्रमण

पोलिसांना निघेना जुना मोटर स्टँड वरील गाड्यांचे अतिक्रमण

310
Adv

जुना मोटर स्टँड वर गाड्यांचे गॅरेज असून वर्षानुवर्षे या गॅरेज मधील गाड्या रस्त्यावर काम करत असताना दिसून येतात जुना मोटर स्टँड परिसरात पालिकेची भाजी मंडई, एक सुसज्ज असं साई अमृत नावाचे हॉस्पिटल ही असून याकडे सर्वसामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी या रस्त्यावरील गाड्यांमुळे तीव्र अडचण निर्माण होते गुरुवार व रविवारी मंडईचा दिवस असतो या दिवशी नागरिकांना तेथून चालणेही अशक्य होते त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे प्रशांत मोदी यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

सातारा शहर ट्राफिक विभागाने वेळोवेळी कारवाई केली होती मात्र पुन्हा ते आपल्या गाड्या रस्त्यावर दुरुस्त करण्यासाठी येत असतात येथून पुढे मात्र आम्ही असे प्रकार होऊ देणार नसल्याचे ट्राफिक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल शेलार यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

सर्व सामान्यांचे अतिक्रमण असले तर ते त्वरित निघते मात्र धनदांडग्यांचे गाड्या या रस्त्यावर असल्या तरी त्यांच्यावर पोलिसांमार्फत काही कारवाई होत नसून जुना मोटर स्टँड राधिका चौक व आदी परिसरातील नागरिक यामुळे तीव्र नाराज झाले असल्याचे दिसून येते

Adv