शाहूनगर च्या सोसायट्यांमध्ये सहा महिन्यानंतर भरपूर पाणी

233
Adv

गेल्या सहा महिन्यापासून शाहूनगर परिसरातील सुमित्रा राजे कॉलनी, पेरेंट्स स्कूल परिसर ,मंगळाई कॉलनी ,इत्यादी वसाहतीमध्ये तब्बल सहा महिन्यानंतर आज पुरेशा दाबाने पाणी आले .त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले .जय सोशल फाउंडेशन सहकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे वॉल योग्यरीतीने फिरवण्याची काळजी घेतल्याने पाण्याचे प्रेशर वाढले आणि नागरिकांची पाणीटंचाई पासून सुटका झाली .

जय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोसले यांनी या सोसायट्यांमधील पाणीटंचाईचा प्रश्न हाती घेतला होता या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांशी त्यांनी चर्चासुद्धा केली . मात्र प्रत्‍यक्षात पाणी टंचाई का होते ? आहे याचे कारण सापडत नव्हते . मग सागर भोसले आणि त्यांचे सहकारी पहाटे तीन वाजता उठून शाहूनगर च्या कॉलन्यांमधून पाणीटंचाईचा आणि समस्येचा शोध घेऊ लागले . सागर भोसले यांना शोधा अंती पाण्याच्या टाक्यांचे व्हॉल्व पूर्ण क्षमतेने फिरवले जात नाहीत हे लक्षात आले . आणि ते व्हॉल्व पूर्ण फिरवल्यानंतर शिवनेरी कॉलनी ,सुमित्राराजे हौसिंग सोसायटी मंडळी कॉलनी ,आणि पॅरेण्ट स्कूल परिसरामध्ये पहाटे चार वाजता तब्बल सव्वा तास पुरेशा क्षमतेने पाणी आले .त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

या परिसरामध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने आणि आठवड्यातून तीनच दिवस पाणी येत होते त्यामुळे नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता यंदाच्या उन्हाळ्यात ही असेच हाल होणार या काळजीने सर्व नागरिकांनी सागर भोसले यांच्याकडे या संदर्भातले गाऱ्हाणे मांडले सदर बाजार कॅम्प आणि चार भिंती या दोन ठिकाणाहून सदर वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो या दोन्ही टाकीचे एकूण सहा वॉल असून ते खाजगी ठेकेदारांच्या नळकरी यांच्या माध्यमातून ऑपरेट केले जातात . कधी कमी दाबाने पाणी तर कधी पूर्ण क्षमतेने वॉल न फिरवल्याने पुरेशा दाबाने पाणी पोहचत नव्हते . काही टाक्यांच्या पाणी उपसा यंत्रणा निकामी झाल्याने सुद्धा अडचण झाली होती या सर्व तांत्रिक समस्यांचे निराकरण सागर भोसले आणि मित्रमंडळ समूहाच्या वतीने करण्यात आले .त्यामुळे बुधवारची सकाळ शाहूनगर वासी यांसाठी अत्यंत सुखद धक्का देणारी ठरली .बहुतांश सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या पाण्याने गच्च भरल्या होत्या जय सोशल फाउंडेशनच्या या सामाजिक कामगिरीचे नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले आहे

Adv