Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धेमध्ये युनायटेड वेस्टर्न कर्मचारी सोसायटी अव्वल*

स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धेमध्ये युनायटेड वेस्टर्न कर्मचारी सोसायटी अव्वल*

219
Adv


खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील प्रथितयश उद्योजक सागर भोसले आणि जय सोशल फाउंडेशन यांच्यावतीने स्वच्छ माझी कॉलनी ही घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये युनायटेड वेस्टर्न कर्मचारी सोसायटी ही अव्वल ठरली स्वच्छतेचे नेटके नियोजन आणि सांडपाण्याचा निचरा या निकषांवर या सोसायटीला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले एका विशेष कार्यक्रमांमध्ये या सोसायटीच्या सभासदांना 21 हजार रुपयांचे बक्षीस सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

बक्षीस वाटपाचा सोहळा नुकताच साताऱ्यात पार पडला .पावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांची प्रमुख उपस्थिती होती .

शहरातील नागरिकांना परिसर स्वच्छता या जबाबदारीची जाणीव होण्याकरिता जय सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून उद्योजक सागर भोसले यांनी स्वच्छ माजी कॉलनी हा अभिनव उपक्रम राबवला होता गोडोली शाहूनगर जगताप आणि रामराव पवार नगर शहराच्या दक्षिण भागातील सुमारे 34 कॉलनी यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता सातारा नगरपालिकेचे निवृत्त आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे यांनी या स्पर्धेमध्ये परीक्षणाची जबाबदारी पार पाडली जगताप वाडी येथील रुक्मिणी हौसिंग सोसायटी यांना द्वितीय तर शाहूनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज हाउसिंग सोसायटी यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले

विजेत्यांना बक्षिसांचे प्रायोजक कर्नल सत्यजित बेबले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सुभेदार विजय चव्हाण तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस हवलदार धीरज दयाळ यांच्या हस्ते देण्यात आले ही दोन्ही बक्षीसे अनुक्रमे पंधरा या स अकरा हजार रुपयांची होती या स्पर्धेमध्ये लोकसहभाग सांडपाण्याचा निचरा परिसर स्वच्छता या घटकांना प्राधान्य देण्यात आले होते या निकषावर या स्पर्धांचे निकाल ठरवण्यात आले जय सोशल फाउंडेशनच्या या पहिल्याच उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या तीन आठवड्यांमध्ये सागर भोसले यांच्या जय सोशल फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वॉटर प्युरिफायर दुरुस्ती नागरिकांना रोपांचे वाटप सुंदर रांगोळी स्पर्धा तसेच दिव्यांगांना वॉकर चे वाटप याशिवाय रीक्षा सुरक्षा अभियान इत्यादी विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेषत्वाने कौतुक केले आहे

Adv